Thursday 5 February 2015

Land Acquisition Act 2013

What is the Central Government’s Ordinance on Land Acquisition Act 2013?

During the campaign for the general elections of Loksabha, the present ruling party has promised the people that they will bring “achchhe din” (better times) for the country. It’s a fact that farmers suicide still continue to take place. It is unfortunate that even after 68 long years of Independence, farmers have to commit suicides out of adverse financial situations. The ordinance brought by the Central Government to amend the Land Acquisition 2013 will worsen the situation further. It may be remembered that the present Land Acquisition Act (2013) has been brought after 118 long years when the incidences of violence occurred in places like Singur, Maan, etc out of protest of farmers for the land acquisition. It transpires clearly that incidence of such violence shall re-occur because of the new amendments brought by an ordinance.

It was expected that the new government will act pro-farmers and provide them some relief. However, this ordinance adequately clarifies that this government is an anti-farmer government and it wants to promote crony capitalism at the cost of farmers and their land.

In the The Right to Fair Compensation and Transparency in Land Acquisition, Rehabilitation and Resettlement Act 2013 (referred as LARR Act for short), there was a provision to seek a prior consent of at least 70 per cent people of the local area before acquiring land for projects. This ordinance has terminated this procedure which means that the government will now be able to acquire any land at its will and whims. This is completely against the democratic procedures.


Also, the LARR Act was equipped with provision to conduct a public hearing as a part of Social Impact Assessment (SIA) before acquiring the land deciding on any project. This provision has been quashed now. Now since no SIA is required, there is no question of any public hearing. Democracy is all about discussions and deliberations which this government is denying. This will deprive the far4mers from their lawful rights.

The LARR act provided that in case a land acquired for a specific purpose remains unused for a period of five years, the land should be transferred back to the original farmer forthwith. However, the new ordinance has diluted this provision to an unacceptable and illogical extent.
The said Act has offered some special concessions to the projects which are in national interest and in public interest. Now through this ordinance, private hospitals and private schools are also included in the list of such projects. Private hospitals charge exorbitant fees not affordable to a common man and the private schools are also very costly for a common man. The government must clarify as to why it wants the private hospitals and private schools to get this undue advantage and favor?

In view of the food security of the country, the LARR Act had a provision that the fertile land having the potential of two or more crops in a year should not be acquired. This provision has been quashed now. Our food security relies on the crop production which we take from fertile lands. The sufficient food cannot be availed without fertile lands. Now through this ordinance, even the irrigated lands can be acquired easily by the capitalists. It is obvious that the government wishes to bring achchhe din only to a few capitalists and not to the farmers.

Gram sabhas are equally important to Loksabha and Vidhan sabhas. Gram sabha elects the representatives of Loksabha and Legislative assembly. So it is obvious that Gram sabha is the mother of Loksabha and Legislative assembly.  Gram Sabha is sovereign. It is not elected but it elects the members of Loksabha (House of people) and legislative assembly. The resources such as water, land and forest; belonging to a village are supposed to be the assets of Gram sabha and therefore central government cannot decide its disposal without consulting the Gram Sabha.    

Since 1857 to 1947, for around 90 long years, thousands of the martyrs have sacrificed their life for freedom. They were dreaming that exit of the British and Home Rule will bring a substantial change to make India a democratic nation. The British left India in 1947 but the country is yet to get the real democracy. The question is whether we will let their sacrifice go in vain or we are ready to sacrifice to establish the democratic means of governance. Let us rise and be ready for any sacrifice which our country demands at this point of time.

Jay Hind!

Yours,


K. B. Alias Anna Hazare

भूमि अधिग्रहण कानून किसके हित में है?


भूमी अधिग्रहण कायद्यामुळे कोणाचे भले होणार?

काय आहे सरकारचा भूमी अधिग्रहण कायद्याखालील वटहूकुम?

निवडणुकीत “अच्छे दिन लायेंगे” अशी हमी देऊन या सरकारने शेतकऱ्यांची मते घेतली. स्वातंत्र्यानंतरच्या ६८ वर्षांनंतरही शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या होतात ही दुर्दैवी बाब आहे. भूमी अधिग्रहण कायदा (२०१३) मध्ये बदल करण्यासाठी केंद्र सरकारने आणलेल्या नव्या वटहूकुमामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसर्या बाजूला भू संपादना विरोधात शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनांना सिंगूर, माण आदी ठिकाणी हिंसक वळण लागल्यामुळेच तत्कालीन सरकारला नवा कायदा आणावा लागला होता. या वटहुकुमामुळे पुन्हा एकदा आंदोलने हिंसक होतील अशी भीती वाटते.  
केंद्रात नवीन सरकार सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे होतील अशी अपेक्षा होती; मात्र या सरकारने भूमी अधिग्रहण वटहुकूम आणून शेतकरी विरोधी पाउल उचलले आहे. ही दुर्दैवी बाब आहे.
या सरकारने शेतजमिनींना तथाकथित विकासवाद्यांचे लक्ष्य आणि भक्ष्य करण्याचे धोरण अवलंबून शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे. लोकशाहीचा अर्थ लोकांनी, लोकांसाठी, लोकांकडून चालवलेले राज्य असा आहे, लोकांना फसवून चालवलेले राज्य असा नाही.
भूमी अधिग्रहण कायदा २०१३ मध्ये अशी तरतूद होती गावातील जमीन अधिग्रहित करतांना ७० टक्के शेतकऱ्यांची  संमती आवश्यक असेल. तरच जमीन सरकारला घेता येईल.  मात्र या सरकारने वटहुकूम काढून ती तरतूद काढून टाकली. म्हणजेच सरकार आपल्या मर्जीप्रमाणे शेतकऱ्यांच्या जमिनी आपल्या ताब्यात घेऊ शकेल आणि आपल्या मर्जीप्रमाणे उद्योग क्षेत्रातील लोकांना देऊ शकेल, हे धोरण लोकशाही विरोधी आहे.


मूळ कायद्यात सामाजिक परिणाम मुल्यांकना अंतर्गत ज्या जागी प्रकल्प उभा राहणार आहे तेथील लोकांची लोकशाही पद्धतीने लोक-सुनावणी होऊन लोक तयार असतील तरच जमिनी घ्याव्यात अशी तरतूद होती पण या सरकारने वटहुकूम आणून ती काढून टाकली आहे. हा निर्णय देखील लोकशाहीच्या संपूर्ण विरोधातील निर्णय आहे आणि शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे.
प्रकल्पासाठी अधिगृहित केलेली जमीन पाच वर्षे त्या प्रकल्पासाठी वापरली गेली नाही तर ती जमीन मूळ शेतकऱ्यास परत देण्यात येईल अशी तरतूद होती. ती ही या वटहुकुमाद्वारे काढून घेण्यात आली आहे. आता सदर जमीन मूळ शेतकऱ्याला परत न देता उद्योगपती सरकारच्या मदतीने आपल्या ताब्यात ठेऊ शकतात.
या कायद्यामध्ये ज्या ठिकाणी खरेखुरे राष्ट्रहित साधले जाते त्यातील काही प्रकल्पांना विशेष सवलत देण्यात आली होती. मात्र आता या वटहुकूमाद्वारे खाजगी हॉस्पिटल्स, खाजगी शिक्षण संस्थांच्या शाळा यांनाही “लोक हिताच्या” यादीत समाविष्ट करण्यात आले आहे, जेणे करून आपल्या कार्यकर्त्यांची सोय व्हावी. शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने घ्यायच्या आणि त्या आपल्या कार्यकर्त्यांना हॉस्पिटल्स, शाळा काढण्यासाठी द्यायच्या यात काय लोकहित आहे ते सरकारने सांगावे.
देशात पुरेसे अन्नधान्य उत्पादन होणे आवश्यक असल्याने शेतीच्या दृष्टीने सुपीक असलेल्या जमिनी सरकारने घेऊ नयेत या भूमिकेतून २०१३ च्या कायद्यात अशी तरतूद करण्यात आली होती की “ज्या जमिनीत दोन किंवा त्याहून जास्त पिके घेतली जाऊ शकतात त्या जमिनी उद्योगांना देऊ नयेत”. आता ही तरतूद वटहुकुमाद्वारे काढून टाकण्यात आली आहे. त्यामुळे अगदी बागायती जमिनी सुद्धा उद्योगपती घेऊ शकतात. यांसारखे शेतकऱ्यांसाठी जाचक अशा अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे फक्त धनाढ्य लोकांसाठीच अच्छे दिन येणार असून शेतकऱ्यांच्या आत्महत्त्यांमध्ये वाढच होणार आहे.
सरकार असे वटहुकूम काढून शेतकऱ्यांवर अन्याय करणार असेल तर इंग्रजांच्या हुकुमशाहीत आणि अशा सरकारमध्ये फरक काय?
लोकसभा, विधानसभा यांच्याइतकेच ग्रामसभांचे स्थान सर्वोच्च आहे. कारण आमदार आणि खासदार ग्रामसभेने निवडून पाठवले म्हणून झाल्या विधानसभा आणि लोकसभा! म्हणजे विधानसभा आणि लोकसभा यांची जननी आहे ग्रामसभा.
ग्रामसभा स्वतंत्र आणि सार्वभौम आहे. १८ वर्षे वय झाले की प्रत्येक माणूस ग्रामसभा सदस्य किंवा वॉर्ड सभा सदस्य होतो आणि एकदा सदस्य झाला की मरेपर्यंत सदस्य असतो. ग्रामसभेला निवडणूक नाही. मात्र ग्रामसभा प्रत्येक पाच वर्षांनी विधानसभा आणि लोकसभेला बदलत असते. ती स्वत: कधीच बदलत नाही. म्हणून राज्य सरकार किंवा केंद्र सरकारला कोणत्याही गावातील जल-जमीन-जंगल यांसारख्या कोणत्याही बाबी घ्यायच्या असतील तर जोपर्यंत ग्रामसभेची मान्यता मिळत नाही तोपर्यंत घेता येत नाहीत असा कायदा करणे आवश्यक होते मात्र या सरकारने ग्रामसभेचा अधिकारच काढून घेऊन लोकशाहीचा गळा घोटला आहे.
प्रश्न उभा राहतो की १८५७ ते १९४७ या नव्वद वर्षांत ज्या लाखो लोकांनी बलिदान केले, हसतहसत फासावर गेले त्यांचे स्वप्न होते की इंग्रज देशातून जावा आणि या देशात लोकशाही यावी. इंग्रज या देशातून गेला पण लोकशाही या देशात आली नाही. काय ते बलिदान व्यर्थ गेले? प्रश्नच आहे.
म्हणून आम्हा भारतीयांना विचार करणे आवश्यक आहे की पुन्हा एकदा आम्हाला बलिदान करावे लागले तरी हरकत नाही मात्र आम्ही ते बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही.

जयहिंद !    
भवदीय,

कि. बा. तथा अण्णा हजारे